दहा किलोमीटरच्या ‘रन’मधून आर. बी. भवार यांना श्रध्दांजली

भुसावळ प्रतिनिधी । नुकतेच दिवंगत झालेले आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार यांना येथील रनर्स ग्रुपतर्फे दहा किलोमीटरच्या रनच्या माध्यमातून आगळी-वेगळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

याबाबत वृत्त असे की,  भुसावळ शहरातील आंतरराष्ट्रीय धावपटू  आर. बी. भवार यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजलीपर विशेष दहा किलोमीटरच्या रनचे आयोजन भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे रविवारी करण्यात आले होते.  रविवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून ठीक सकाळी सहा वाजता शहरातील धावपटूंनी धावायला सुरुवात केली. आरपीडी रोड वरून  झेङटीएसपर्यंत व तेथून पुन्हा मैदानावर परत असा रनचा  मार्ग होता. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. त्यानंतर श्रद्धांजलीपर बोलताना भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांनी दिवंगत भवार काका यांच्या आठवणींना उजाळा दिला.  ते याप्रसंगी म्हटले की, भवार काका रेल्वेत नोकरीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक रनिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.  सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांनी धावायची दिनचर्या कायम ठेवली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!