दहावी सीबीएसई परिक्षेत हित लोढाचे यश

शेअर करा !

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी) । दहावी सीबीएसई परिक्षेचा आज दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. या परिक्षेत जामनेर येथील लॉर्ड गणेशा स्कुलचा विद्यार्थी हित लोढा याने ८५ टक्के गुण मिळविले आहे. त्याच्या यशाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

store advt

पहूर येथील तेजस ज्वेलर्सचे संचालक महेंद्र रिखबचंद लोढा यांचा मुलगा हित लोढा हा जामनेर येथील लॉर्ड गणेशा स्कुल मध्ये दहावीचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच दहावी सीबीएसई परिक्षा दिली होती. परिक्षेचा निकाल आज लागला असून त्यात हित याने ८५ टक्के गुण यश संपादन केले आहे. त्याला त्याचे शाळेचे शिक्षकवृद, आई, वडील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशात आजी-आजोब यांचा सिंहाचा वाटा आहे, असे हितने सांगितले. त्याचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!