दगडी दरवाज्यावर मांगीर बाबा मूर्तीची स्थापना

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन दगडी दरवाज्यावर काल मांगीर बाबा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

 

शहरातील येथील दगडी दरवाज्यावर मातंग समाजाचे आराध्य दैवत मांगीर बाबा यांची मूर्ती शुक्रवारी स्थापन करण्यात आली. यावेळी शहरातील समाज बांधव उपस्थित होते. मातंग समाज मांगीर बाबांना आपले दैवत मानत असून गेल्या काही वर्षांपुर्वी दगडी दरवाज्याचा बुरुज ढासळल्याने ही मूर्ती देखील काढण्यात आली होती. म्हणून तीमूर्ती त्याच जागेवर पुन्हा स्थापन करण्याची मागणी विविध स्तरातून जोर धरू लागली होती. त्याबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. काल दिनांक १० मार्च रोजी शुक्रवारी ही मूर्ती त्याच ठिकाणी स्थापन झाल्याने जनतेत समाधानाचे वातावरण होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

Protected Content