दंगली घडविण्यासाठी उध्दव ठाकरेंनी घेतली होती बैठक : नितेश राणे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे आणि राऊत यांना टार्गेट करत जोरदार टिका केली. याप्रसंगी त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केला.

भाजप नेते नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, १३ ऑगस्ट २००४ रोजी उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली होती. यात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा कट रचण्यात आला होता. या माध्यमातून हिंदू व मुस्लीम तणाव निर्माण होऊन आपल्याला सत्ता मिळेल असा ठाकरेंचा अंदाज होता. याच प्रमाणे राज्यात गेल्या नऊ महिन्यांमध्ये झालेल्या दंगलीत अजून कुणाचा हात आहे का ? याची चौकशी सरकारने करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली.

 

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार” असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दमदाटी करून जागा घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांनी अवघ्या काही रुपयांमध्ये घेतली असं राणे यांनी म्हटलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content