त्रिवेदी व राज्यपालांची हकालपट्टी करा – शिवसेनेची मागणी

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध व महाराष्ट्रातून कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावदा तर्फे दिनांक 22/11/2022 रोजी सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन देण्यात आले.

त्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी संभाजीनगर येथे बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात दीक्षा तर कार्यक्रमात छत्रपती हे पूर्वीचे आदर्श होते. गडकरी आताच्या आदर्श आहेत, कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना गटकरींची केल्याने त्यांचा निषेध करतो. राज्यपाल कोशारी नेहमी वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावतात तरी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अशा वादग्रस्त राज्यपालाची हकालपट्टी करावी शिवाजी महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत त्यांची तुलना गडकरींची करणे हा छत्रपतींचा अवमान आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी _औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असे वादग्रस्त विधान केले त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनावर शिवसेनेचे मिलिंद पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, भरत नेहेत शहर प्रमुख, शरद भारंबे शहर संघटक, योगिताताई वायकोळे, महिला आघाडी तालुकाप्रमुख, धनंजय चौधरी माजी नगरसेवक, शाम पाटील, माजी नगरसेवक, डिंगबर महाजन, गौरव भैरवा उपशहर प्रमुख, सुनील राणे, किरण गुरव, शेख फरीद हे उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content