‘त्या’ समाजकंटकांवर कठोर व कडक कारवाई करा : आंबेडकरवादी जनसंघटनांची मागणी

शेअर करा !

जळगाव, प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती मार्फत ,बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या “राजगृहावर ” झालेल्या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त करून या घटनेला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

store advt

जळगाव जिल्हा आंबेडकरवादी जनसंघटनांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, दादर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ची काही समाजकंटकांनी नासधूस व तोडफोड केली आहे. या निंदनीय कृत्याचा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी जनसंघटनातर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. अशा जमातवादी दृष्ट प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान या देशातील कोट्यावधी जनतेचे प्रेरणास्थान तथा आदर्श आहे. अशा प्रेरणास्थानाची तोडफोड करून राज्यात अशांतता व अराजकता माजविण्याचा अशा समाजकंटकांचा डाव व षडयंत्र आहे. अशा समाजकंटकांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना समितीचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे , कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , दिलीपभाऊ सपकाळे , भारत ससाणे ,चंदन बिऱ्हाडे , भारत सोनवणे उपस्थित होते .

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!