‘त्या’ मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक शिक्षा करा; पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडीची मागणी

पाचोरा प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मागासवर्गीय समाजातील मुलीवर ज्या अमानुषपणे अत्याचार केला व अत्यंत पाशवीपणाने तिच्या पाठीचे हाड मोडले, तिची जीभ कापली अशा ह्या नराधमांना अत्यंत कडक शिक्षा द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडितर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध केला आहे.

बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल लोंढे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आत्याचार झाल्यानंतर ही मुलगी ७ ते ८ दिवस मृत्युशी अक्षरश: झुंज देत असतांना तीची प्राणज्योत मालवली. तरी सुध्दा उत्तरप्रदेश सरकारने ठोस असे पाऊल उचलले नाही. कारण ती मुलगी मागासवर्गीय होती म्हणून तर सरकारने या नराधमांवर कारवाई कार्यवाही करण्याचे लेचेपेचे धोरण अवलंबीले असावे असे आम्हांला वाटते. तरी हाथरस येथील अत्याचारीत मुलीला न्याय द्यावा व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पाशवी नराधमांना अत्यंत कडक शासन करावे म्हणजेच फासावर लावावे. पुन्हा आम्ही त्या नराधमांचा जाहिर धिक्कार करतो असे निवेदनात नमुद केले आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, भावराव पवार, सुनिल सुरवडकर, अॅड. त्रिशिला लोंढे, शशी मोरे, धर्मा खेडकर, भैय्या सोनवणे, अनंत मोरे, महेंद्र खेडकर, पृथ्वीराज लोंढे, किशोर बागुल, तपन शिरसाठ, अजिम शेख, रामा तांबे, आकाश बनसोडे, नितीन पवार, सुभाष ठाकरे, रमेश मगर, नाना महिरे, सुरेश खैरनार, संघमित्र लोंढे, पवन खैरनार, गौरव साठे, अशोक गायकवाड, अनिल जोगळे, छन्नु सपकाळे, दिपक जाधव, गणेश पवार, संदिप पवार, योगेश कदम, गौतम बागुल, प्रमोद पाटील, किरण सोनवणे, किशोर कापुरे आदींच्या स्वाक्षरी आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंञी गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील व पाचोरा पोलिस निरिक्षक यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारींना पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content