‘त्या’ नराधमांना दगडाने ठेचून जागीच ठार करा : मनियार बिरादरी

जळगाव प्रतिनिधी | सध्या महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून हे अत्याचार करणार्‍या नराधमांना ठेचून जागीच ठार मारावे अथवा याचा कायदा करावा अशी मागणी जिल्हा मनियार बिरादरीने एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

 

 

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा  मनीयार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात झाली. यात महिलांवरील अत्याचारासाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा हा ठराव संमत करण्यात आला. या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की,  नोटबंदी ,जीएसटी, कृषी कायदे, सीएए , लागू होऊ शकतात  कलम ३७० रद्द होऊ शकते  तर दिशा व शक्ती कायद्याला उशीर का?  एकाच रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते जीएसटी लागू शकतो कृषी कायदे ,सीएए  व ३७० चे कायदे दोन्ही सदनात पास होऊ शकतात तर बलात्कारी पुरुषाला दगडाने ठेचून मारण्याचा वटहुकूम व कायदा का अमलात येऊ शकत नाही ? अशी खंत सुद्धा व्यक्त करण्यात आली एवंढेच नव्हे तर दिशा व शक्ती कायदा ची अंमलबजावणी  का होऊ शकत नाही? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

 

यात पुढे म्हटले ाहे की, ज्याप्रमाणे निर्भयावर बलात्कार करून तिला जीवे मारण्यात येते व त्याच्या आरोपीला पकडून सुद्धा मुख्यमंत्री ३० दिवसात पोलिसांनी दोषारोपपत्र सादर करावे असे आदेश देत असेल तर न्यायालयाचा निकाल केव्हा लागेल? वास्तविक पाहता महाराष्ट्राने हे बघितले आहे की एका रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवली जाते ? सकाळी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो ?  विधी मंडळाने बारा आमदारांची शिफारीश करून सुद्धा तिची अंमलबजावणी होत नाही ?  केंद्रीय मंत्र्याला एका भाषणा मूळे अटक करण्यात येते ?अशा या समयी महाराष्ट्रात जर बलात्काराचे प्रमाण वाढले असेल तर  राज्यपाल कोषयारी व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शक्ती कायदा लावण्यास तत्परता का दाखवत नाही?

 

या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,  महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर ६ महिन्यासाठी वटहुकूम जारी करून बलात्कारी पुरुषाला भर चौकात दगडाने ठेचून मारण्याचा वटहुकूम जारी करावा व सहा महिन्यात याचा परिणाम दुसरे गुन्हेगारावर काय होतो ते बघावे व नंतर त्याचं कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे.  बलात्कार करणार्‍यांना ज्याप्रमाणे जात-धर्म नसतो त्याप्रमाणे बलात्कारित महिला सुद्धा जात धर्माच्या पलिकडच्या असतात त्यामुळे प्रत्येक समाजाने पीडिता ही कोणत्या समाजाची आहे हे न बघता आता  रस्त्यावर येऊन तिला न्याय मिळवून द्यायला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक असल्याचे मत बिरादरी चे अध्यक्ष फारूक शेख यांनी व्यक्त केले आहे.

 

या सभेत शहराध्यक्ष सय्यद चॉंद सय्यद अमीर, संचालक हारून मेहबूब, अल्ताफ शेख, रउफ रहीम, जूनकर नैन, सलीम मोहम्मद, नशिराबादचे रियाज शेख, शिरसोली चे नबी मिस्तरी, लुकमान शेख, पालधी चे अजित शेख, धरणगाव चे फिरोज शेख ,नसीम बी शेख सत्तार, खेडी कडोली चे शेख रुबाब, नफिसा बी शेख हसन, मुस्कान बी शेख, शेख रफीक, आफ्रीन अंजुम शेख, फिरीज शेख यांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!