तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विहिरीचे काम करणार्‍या शेतकर्‍याचा अचानक तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.

 

या संदर्भात मिळालेली माहिती  अशी की गिरधर खिलचंद नेहते ( वय३४ वर्ष राहणार न्हावी तालुका यावल ) हे दिनांक ५ मे रोजी न्हावी शेत शिवारातील गावालगत असलेल्या आपल्या शेतात काम करीत होते. याप्रसंगी तोल सुटुन तो विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असुन,  याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर मरण पावलेल्या तरूणाचा  मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल रूग्णालयात आणुन त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मोहीनी भुगवाडया यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले .     फैजपूर तालुका यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मयत तरुण शेतकरी गिरधर नेहेते यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची खबर फैजपूर पोलिस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन. पुढील तपास फैजपूरच्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेश बर्‍हाटे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content