तृतीयपंथीच्या शापाची अफवा अन् महिला लावताय निंबाच्या झाडाखाली दिवे !

भुसावळ / जामनेर/एरंडोल/धरणगाव  (प्रतिनिधी) एका तृतीयपंथींने मृत्यूसमयी दिलेल्या कथित शापाच्या अफवा भुसावळ आणि जामनेर तालुक्यात पसरल्यानंतर महिलांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्मशान भूमीसह घराच्या परिसरातील निंबाच्या झाडाखाली दिवे लावलायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही तालुक्यात तृतीयपंथीने दिलेल्या शापाची कहाणी वेगवेगळी आहे. निव्वळ एका अफवेमुळे मोठ्या प्रमाणात महिला आज अंधश्रद्धेला बळी पडल्याचे चित्र होते.

store advt

रावेरच्या दंगलीत एका तृतीयपंथी जखमी झाल्यानंतर त्याने मृत्यूसमयी शाप दिला की, तुम्ही मला वाचवू शकणार नाही तर तुमच्या जातीतील मुले मरणार. पण शापातून मुक्‍त व्हायचे असेल तर मुलगा असलेल्या आईने स्मशानात किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा लावण्याची कहाणी भुसावळात पसरली होती. तर जामनेर, धरणगाव, एरंडोल तालुक्यात देखील अशीच कहाणी होती, फक्त या ठिकाणी कुठल्याही विशिष्ठ जातीला नव्हे, तर हा शाप सरसगट सर्वांसाठी होता. तर तृतीयपंथीची हत्येचे ठिकाण नेमके सांगितलेले नव्हते. या अफवेमुळे दोन्ही तालुक्यातील बहुतांश महिलांनी स्मशानभूमीसह घरा जवळील भीतीपोटी लिंबाच्या झाडाखाली दिवे लावले. दरम्यान, आज सकाळपासून देखील अशा पद्धतीचे फोन जिल्हा भरात सुरु होते.

अपडेट :

या सर्व प्रकारावर तृतीयपंथियांचे गुरू राणी जान उर्फ जगनमामा यांनी व्हिडीओ जारी करून या अंधश्रध्देला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे वृत्त आणि व्हिडीओ आणि येथे क्लिक करून वाचू शकतात.

error: Content is protected !!