तृणधान्य पीकांबाबत कार्यशाळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रीया व उत्पादन वाढीसाठीचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आज ऑनलाईन व ऑफलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रीया व उत्पादन वाढीसाठीचा कृती आराखडा तयार करणेबाबत ऑनलाईन व ऑफलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी तृणधान्याचे महत्व पटवुन देण्यासाठी कशा प्रकारे जनजागृती करता येईल व यामध्ये कोणाकोणचा सहभाग नोंदविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गहु व तांदुळ या पिकांवर मर्यादा आल्याने तृणधान्याचा वापर जीवनात महत्वाचा राहणार आहे असे स्पष्ट केले. त्याचबरोबर तृणधान्यावर कोणत्याही रासायनिक खतांची, किटकनाशकांची फवारणी नसल्याचे आरोग्यास फायदेशीर असल्यामुळे मानवी जिवनास उपयुक्त ठरणारे व किफायशीर असे धान्य आहे. तदवतच या तृणधान्याच्या उत्पादकेमुळे जनावरंाना सुध्दा सेंद्रीय पध्दतीचा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगीतले.

कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी महिनानिहाय आराखडा करण्यासाठी व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यासाठी विविध भागधाकांची विस्तृत यादी करुन ज्यामध्ये तृणधान्य पिकवणारे प्रगतिशिील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापिठे, कृषि विद्यालय, आहार तज्ञ, योगा तज्ञ, प्रमुख व्यापारी, प्रकीयाधारक, निर्यातदार, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व इतर प्रसार माध्यमांची मदत घेवुन गावपातळी ते जिल्हास्तरपर्यंत सर्वांचा सहभाग घेवुन आराखडा तयार करणेबाबत प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षी महिनानिहाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

बैठकीत सर्वप्रथम डॉ.हेमंत पाटील, सेवानिवृत्त बाजरा पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, धुळे यांनी बाजरा पिकाचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवुन देवुन बाजरी पिकाचे रोजच्या आहारातील महत्व कसे याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सदरील बाजरीतील धनशक्ती या वाणात ८१ पीपीएम लोह व ४२ टक्के झिंक असल्याचे सांगितले तसेच सदरील वाण रक्तातील हिमोग्लोबीन वाढण्यास सुध्दा फायदेशिर असुन प्रत्येकाने रोजच्या आहारात बाजरीचे सेवन करणे महत्वाचे असल्याचे नमुद केले. अद्यापपर्यंत राहुरी कृषि विद्यापिठ, राहुरी यांचेकडुन कोणकोणत्या वाणांचे संशोधन करण्यात आले आह याबाबत माहिती दिली. पौष्टिक तृणधान्याचे महत्व घरोघरी कशा प्रकारे पोहविता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर श्रीमती सिमा पाटील, योग तज्ञ, जळगाव यांनी धावपळीच्या जिवनात योग कशा प्रकारे महत्वाचा आहे याबाबत माहिती विषद करुन योग व आहार यांचे संतुलन राखणे सुध्दा महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी व लहान मुलांनी सुध्दा रोजच्या आहारात विविध पाककृतीतर्ंगत तृणधान्याचा वापर घरातील प्रत्येक गृहिणीने करावा असे सांगीतले.

संचालक, वैभव इंडस्ट्रिज, जळगाव यांनी तृणधान्यापासुन तयार करण्यात आलेली विविध उपपदार्थ याची माहिती दिली. सदरील विविध उपप्रदार्थाचे नमुने म्हणुन जिअकृअ यांचे दालनात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये प्रामुख्याने वरई भगर, नाचणी फलेक्स्, रवा, किनवो फलेक्स् ज्वार फलेक्स् सवा फलेक्स्, इ. तृणधान्य उपपदार्थाचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. त्यासाठी सद्यस्थितीत आपल्या जिल्हयात तृणधान्याचे उत्पादन कमी प्रमाणात असल्याने आवश्यक असलेला कच्चा माल इतर राज्यातुन खरेदी करावा लागत आहे. जिल्हयातील इतर शेतकर्‍यांनी पारंपारीक शेती सोडुन तृणधान्याचे उत्पादन वाढविल्यास त्यांना प्रथम प्राधान्य देवुन व तपासणी करुन तृणधान्य खरेदी करणेबाबत योग्य प्रक्रीया राबविण्यात येईल असे सांगीतले.

या प्रसंगी श्रीमती वंदना पाटील, अध्यक्ष, गायत्री महिला बचत गट यांनी तृणधान्यातील पोषक तत्वे याबाबत माहिती दिली. डॉ.अनंत पाटील, आहार तज्ञ यांनी सुध्दा तृणधान्याचे दैनंदिन आहारातील महत्व पटवुन दिले. तसेच रोजच्या आहारात बाजरीची खिचडी, समाविष्ट करण्याचे सांगितले तसेच बाजरीची खिचडी महत्व पौष्टीक दृष्टया महत्व पटवुन दिले.

या प्रसंगी संभाजी ठाकुर, जिअकृअ जळगाव, अनिल भोकरे, कृषि उपसंचालक, डॉ.हेमंत पाटील, सेवानिवृत्त बाजरा पैदासकार, राहुरी कृषि विद्यापिठ, डॉ.सोनवद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास, जळगाव, उपविभागीय कृषि अधिकारी दादासाहेब जाधवर, तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे, शिवाजी राऊत, भगवान गोर्डे, रमेश जाधव, कृषि विज्ञान केंद्राचे वैभव सुर्यवंशी, तुषार गोरे, श्रीमती स्वाती कदम, गायत्री महिला बचत गटाच्या श्रीमती वंदना पाटील, ओम महिला गृह उद्योगाचे विलास गायके, वैभव इंडस्ट्रिज चे संचालक, योगतज्ञ श्रीमती सिमा पाटील, ग्रोवर्ल्ड चे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी राहुल पाटील, सुधाकर पाटील व मधुकर पाटील उपस्थित होते.

त्याचबरोबर ऑनलाईन प्रणालीव्दारा कृषि आयुक्तालयाचे कृषि उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांनी विशेष उपस्थित राहुन पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाईन प्रणालीवर डॉ.पंकज पाटील, श्रीमती अमृता राऊत, कृविके, धुळे, डॉ.अनंत पाटील, आहार तज्ञ, श्रीमती दिपाली पाटील, श्रीमती माधवी घोरपडे, मंडळ कृषि अधिकारी, विजयसिंग परदेशी, प्रकल्प अधिकारी, बालकल्याण प्रकल्प, श्रीमती भारती गौरव, खुशाल बर्‍हाटे, शालीग्राम लहासे, अतुल साळी, ज्ञानेश्वर पवार, सविता नयनवाड, शिरिष जोशी, श्रेयांश सुर्यवंशी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: