तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय विसरू नका ; संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना सुनावले

मुंबई (वृत्तसंस्था) यादी कसली मागताय? तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात, हे विसरू नका अशा शब्दांत संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रवाशांची यादी मागण्याच्या मुद्द्यावरून सुनावले आहे.

 

स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वेगाडय़ा कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या देतो, असे ट्विट केले होते. तसेच त्यांनी राज्याकडे प्रवाशांची यादी देण्याचीही मागणी केली होती. पीयूष गोयल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यासाठी तयार आहोत, असे सांगत राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा त्यांनी ट्विट करत १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची आपली तयारी असताना फक्त ४६ ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत पीयूष गोयल यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना टोला लगावत तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करता हे विसरू नका असे म्हटले आहे.

Protected Content