तुमचाही दाभोलकर होणार ! : शरद पवारांना धमकी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दाभोलकर करण्याची अर्थात ठार मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी सुप्रीया सुळे यांनी कार्यवाहीची मागणी केली आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली असून तुमचाही दाभोलकर होणार, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना केली आहे.

 

राज्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात जातीय तणाव वाढला असून बर्‍याच शहरांमध्ये जातीय दंगली झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, शरद पवार यांना धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content