तीन लाखासाठी विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । माहेरहून तीन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या  पतीसह दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, उजमा शेख इमरान  (वय-२१) रा.  फातेमा नगर जळगाव यांचा विवाह औरंगाबाद येथील शेख इमरान शेख लुकमान यांच्याशी ९ फेब्रुवारी २०२० रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर पहिला आठवडा चांगला गेला. त्यानंतर त्यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. सासू रूक्साना शेख लुकमान आणि नंदोई खलील बाबु बनौटी सर्व रा. बीड बायपास रोड औरंगाबाद यांनी देखील मारझोड केली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून तीन लाख रूपये आणावे यासाठी गांजपाठ करण्यास सुरूवात केली. हा त्रास सहन न झाल्याने त्या जळगावात माहेरी निघून आल्यात. सोमवार १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू व नंदोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!