पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार २० जानेवारी रोजी शहरातील न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल येथे आयोजित करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनात पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित नविन आदर्श माध्यमिक विद्यालयातील प्राथमिक गटात इयत्ता ८ वी तील प्रज्वल महालपुरे व माध्यमिक गटात इयत्ता ९ वी तील यश चावरे या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. त्यांच्या या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. त्यांना शाळेतील विज्ञान शिक्षिका अल्पा एम. सायाणी (कोटेचा) यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, गटशिक्षणाधिकारी गिरीष जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, व सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा शिंदे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कौतुक केले आहे