ताकद योग्य वेळी दाखवू ; संभाजीराजेंचा सूचक इशारा

 

मुंबई : वृत्तसंस्था । छत्रपती घराण्याचे काम पेटवणे नाही न्याय देणे आहे ताकदच पहायची असेल, तर योग्यवेळी दाखवू. ती दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही लोक कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

 

 

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये  जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. ते राज्यभर दौरा करून अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पाठोपाठच अनेक संघटना देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. भाजपा नेते नारायण राणे यांनी या संभाजीराजेंवर या मुद्यावरून टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे.

 

 

छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. राजांना रयत भेटायला येते , हे का फिरतायत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली पुण्यातील पत्रकारपरिषदेत केली होती.

 

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा, केंद्राच्या आरक्षण सूचित समाजाचा समावेश करण्यासाठी राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना प्रस्ताव पाठवावा तसेच  समाजाच्या विविध मागण्यांबाबत ६ जूनपूर्वी तोडगा काढावा. अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी  कोरोनाची पर्वा न करता राज्यभरात आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली जाईल आणि त्याची सुरुवात रायगडावरून केली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. या समाजासाठी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.