तळोंदा प्र.चा. येथे ५०० जणांचे विक्रमी लसीकरण

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  तालुक्यातील तळोंदा प्र.चा. येथे  खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून ५०० जणांसाठी लसीचा  साठा उपलब्ध झाल्याने आज सोमवार १३ सप्टेंबर रोजी विक्रमी लसीकरण करण्यात आले.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  तालुक्यातील तळोंदा प्र.चा. येथे कोव्हिशिल्ड लसीचा साठा उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून माजी सरपंच साहेबराव राठोड यांचे विशेष प्रयत्न सुरू होते. दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून   ५०० लसीचे डोस उपलब्ध झाल्याने शनिवार व सोमवार रोजी अशा दोन दिवसांत येथील जिल्हा परिषद शाळेत भव्य लसीकरण करण्यात आले. सदर शिबिरात सुनील नरसिंग राठोड यांनी प्रथम लस टोचून घेतली. गावातील ५०० जणांनी लसीकरण करून घेतल्याने कोरोनाला हरवून परत लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हे चित्र सध्या तळोंदा प्र.चा येथे पहायला मिळत आहे. माजी सरपंच साहेबराव राठोड यांच्या अथक परिश्रमातून हे लस उपलब्ध झाल्याने त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी आरोग्य विभागाकडून आरोग्य सहाय्यक आर. जे. जोहरी, आरोग्यसेवक नितीन तिरमाळी, आरोग्यसेविका लक्ष्मी कदम, माजी सरपंच साहेबराव राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!