तलावात ५ तरुणांचा बुडून मृत्यू ; मृतांत तीन सख्ख्या भावांचा समावेश

शेअर करा !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) तलावात अंघोळीसाठी उतरलेल्या ५ तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मृतांत तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

store advt

 

समीर शेख मुबारक शेख (१७), शेख अन्सार शेख सत्तार (१७) या दोघांसह आतिक युसूफ शेख (१८), तालेब युसूफ शेख (२१) व सोहेल युसूफ शेख (१६) या तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी १ वाजता शेंद्रा एमआयडीसीतील डोंगरपायथ्याशी असलेल्या नाथनगर शिवारात जवळच्या तलावात पाच तरुण अंघोळीसाठी उतरले. मात्र खोलीचा अंदाज न आल्यामुळे तलावात उतरताच दोन जण बुडायला लागले. त्यांना वाचवण्यासाठी इतर तिघे उतरले. मात्र त्यांनाही खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाचही जण पाण्यात बुडाले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!