जळगाव, प्रतिनिधी । नंदुरबार जिल्ह्यात भाजपा नगरसेवकाने तलाठीपदावरील आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला आहे. महिलेचा अपमान करणाऱ्या नगरसेवकास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, नंदुरबार जिल्ह्यात भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी ५ जून रोजी शासकीय कर्मचारी निशा पावरा तलाठी या आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्या असल्याने ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भाजपची प्रवृत्तीच महिलांना छळण्याची असल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील समस्त महिला वर्गाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो. या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, या प्रकारात दिरंगाई झाल्यास निषेधार्थ मोर्चा काढण्यात येईल या महिलेस तात्काळ योग्य तो न्याय मिळावा असे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याप्रसंगी मीनाक्षी चव्हाण, दीपिका भामरे, सलीम इनामदार, वाय. एस. महाजन सर आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/814024182865274