तरूणाचा अपघाती मृत्यू : वाहन चालक अटकेत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील म्हैसवाडी येथील तरूणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कारणभूत असलेल्या वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.

 

यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील राहणार्‍या अज्ञात वाहनाने तरूणाचा रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या  भिषण अपघातात मोटरसायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली होती . या हिंगोणा गावाजवळ झालेल्या भिषण अपघातास कारणीभुत असलेल्या  वाहन व चालक हा अपघात झाल्यावर घटनास्थळावरून वाहन घेवुन पसार झाला होता. अखेर मिळालेल्या माहीतीच्या आधारावर त्या वाहनाची वाहन चालकाची ची ओळख पटली असुन सदरच्या वाहनचालकाचे नांव शाहबाज शाह जाकीर शाह राहणार हिंगोणा तालुका यावल असे असुन त्या अटक करण्यात आली आहे.

 

या  अपघाताला कारणीभुत चालकाच्या ताब्यातील महेन्द्र कंपनीची बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक एमएच १९ सिवाय ६५६१ हे वाहन फैजपुर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.  या संदर्भात दिनांक १३ मे रोजी हिंगोणा गावातील पोलीस पाटील दिलीप जगन्नाथ बाविस्कर यांनी फैजपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेश बर्‍हाटे हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content