तमिळनाडूतील पावर प्लांटमध्ये भीषण स्फोट ; ६ जणांचा मृत्यू

चेन्नई (वृत्तसंस्था) तमिळनाडूमधील कुडलोर जिल्ह्यात नेयवेली पावर प्लांट प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून १३ हून अधिक लोक जखमी झाली आहेत.

store advt

 

कुडलोरमधील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून १३ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आकाशात दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

error: Content is protected !!