ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसावर धारदार शस्त्राने वार

शेअर करा !

भिवंडी (वृत्तसंस्था) भिवंडी शहरातील टावरे कंपाउंड इथे रात्री दोन जणांमधील वाद झालेला वाद सोडवत असतानाच पोलिसावर धारदार शस्त्राने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस हवालदाराचे नाव प्रफुल्ल दळवी (५२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

store advt

 

भिवंडी शहरातील टावरे कंपाउंड इथे रात्री दोन जणांमधील वाद झालेला वाद सोडवत असताना ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसाने या दोघांनाही समजावले. परंतू तरुणाने अरेरावीची भाषा करत धारदार शस्त्राने पोलिसाच्या हातावर, पाठीवर चाकूने सपासप वार करून जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर तरुणाने घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी जखमी प्रफुल्ल दळवी यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!