डोनॉल्ड ट्रंप यांच्या दौर्‍याला मनसेचा विरोध

शेअर करा !

मुंबई प्रतिनिधी । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांच्या आगामी अहमदाबाद येथील दौर्‍याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४-२५ फेब्रुवारीला भारताच्या दौर्‍यावर येत आहेत. यात ट्रम्प हे  अहमदाबादलाही भेट देणार असल्याची माहिती समोर आली असून याला मनसेने विरोध केला आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद, त्या कार्यक्रमाचे नाव केम छो मिस्टर प्रेसिंडेंट? हे केम छो का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

अहमदाबाद शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम आता सरदार वल्लभभाई स्टेडियम म्हणून ओळखलं जाणार असून त्याची प्रेक्षकक्षमता १.१० लाख इतकी आहे. २०१५साली ५३००० प्रेक्षकक्षमता असलेलं मोटेरा स्टेडियम पाडून नवं स्टेडियम बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या या स्टेडियमचं उद्धाटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, या दौर्‍याला आता मनसेने विरोध केला असून यावरून आता राजकीय लढाई रंगण्याची शक्यता आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!