यावल : प्रतिनिधी । डोंगरकठोरा येथील महिलांच्या शौचालयाचे काम दर्जेदार होत नसल्याने ग्रामस्थांनी कंत्राटदाराविरोधात पंचायत समिती कार्यालयाकडे तक्रार करून तपासणी आणि चौकशीची मागणी केली आहे
तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतकडून १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन सुरू असलेले महीला शौचालयाचे काम ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ठ प्रतिचे करण्यात येत असुन काम पावसाळ्यातच कोसळ्ण्याची भिती ग्रामस्थांकडुन करण्याात येत आहे , यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या कामाची स्वताः चौकशी केल्याशिवाय कामाची रक्कम ठेकेदारास अदा करू नये अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे .
डोंगर कठोरा येथील वड्री रस्त्यावरील आदीवासी तडवी वस्तीजवळ ग्रामपंचायतकडून महीला शौचालय बांधण्यात येत आहे या कामाच्या ठेकेदाराने शासनाने ठरवुन दिलेल्या अटीशर्तींना धाब्यावर ठेवुन कामे अत्यंत निकृष्ठ प्रतिची केली आहेत चुकीचे व निकृष्ठ साहीत्य वापरून केलेले छत व बांधकाम येणाऱ्या पावसाळयात कोसळण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
वेळीच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दखल घेवुन चौकशी करावी ठेकेदाराने केलेल्या कामांची गुणवत्ता तपासावी अन्यथा पावसाळ्यात या शौचालयात मोठी दुर्घटना होवुन निरपराध महीलांना जिव गमवावे लागु शकतात अशी प्रतिक्रिया डोंगर कठोरा ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे . या आधीही गटविकास अधिकारी यांनी सामाजीक कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत काही दलाल मंडळींच्या मध्यस्थीने त्यांची लाखो रुपयांची बिले काढुन दिल्याची चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात आहे .