डोंगरकठोरा रस्त्यावरील वळणावर झाडांची फांदे धोकादायक; हटविण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । यावल ते फैजपूर मार्गावरील डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा या मार्गावरील वळणावर धोकादायक झाडांच्या फांद्यांमुळे अपघातास निमंत्रण येत आहे. ती दुर करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल ते फैजपुर रस्त्यावर असलेल्या डोंगरकठोरा फाटा ते डोंगरकठोरा गाव दरम्यानच्या ४ किलोमिटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अत्यंत धोकादायक वळणावर वाहनांसाठी अडचणींच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या या एसटी प्रवासी तसेच मालवाहतुक करणाऱ्या वाहनावर बसुन जाणाऱ्या प्रवासांना गंभीर दुखापत किंवा प्रसंगी अपघात होवुन जिवाला मुकण्याची शक्यत आहे.  यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गावरी वाढलेल्या वृक्षाच्या फादंया कमी करावे, जेणे करून संभाव्य अपघाताचे धोके व एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासांना होणाऱ्या  गंभीर दुखापतीचे प्रसंग टाळावे अशी मागणी या परिसरातील नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!