डोंगरकठोरा येथे शेतात सालदाराची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा येथील सालदाराने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीला आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की,  शेतमजूर गुलाब शंकर बारेला (वय-५५) रा. गुडग्या पाल. तालुका रावेर ह.मु. डोंगरकठोरा ता. यावल हे पत्नी सह राहतात. गावातील डॉ. राजेंद्र झांबरे यांच्या शेतात गेल्या पाच वर्षांपासून सालदार म्हणून कामा करतात. नेहमीप्रमाणे आज ३० मे रोजी सकाळी पत्नीसह गुलाब बारेला शेतात गेले. पाणी घेवून येतो असे पत्नीला गुलाब बारेला  सांगून गेले. बराच वेळ झाल्याने पती परतले नाही म्हणून त्यांनी शोधाशोध केली असता एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शेतमालक डॉ. राजेंद्र झांबरे यांनी पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांना माहिती कळविली. मृतदेह खाली उतरवून तातडीने ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवारत आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.