डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताश्यांच्या गजरात निघाली मिरवणूक

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्रळा परिसरातील प्रबुद्धनगर येथे ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यात आबालवृद्ध मोठ्या उत्सवाने सहभागी झाले होते.

 

मागील २ वर्षापासून कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करता आली नव्हती. मात्र, यावर्षी मोठ्या उत्सहात डॉ. आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. प्रथम बुद्ध वंदना म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, नगरसेवक मयूर कापसे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, नगरसेवक विजय चौधरी आदी उपस्थित होते. बोद्ध पंथ मंडळाच्या वतीने प्रबुद्धनगर पिंप्रळा परिसरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणूकीत बोद्ध पंथ मंडळाच्या अध्यक्षा कविता संजय सपकाळे, उपाध्यक्ष सुनंदा सपकाळे, खजिनदार रेखा शिरसाळे व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

Protected Content