डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रिव्हाइज्ड बेसिक कोर्स कार्यशाळेचा समारोप

 जळगाव, प्रतिनिधी  । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल एज्युकेशन युनिटद्वारे ७ ते ९ सप्टें असे तीन दिवसीय रिव्हाइज्ड बेसिक कोर्स कार्यशाळेचा समारोप नुकताच करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला आहे.

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमईटी हॉलमध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून कार्यशाळेस सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे डॉ. संदिप कडु याची विशेष उपस्थीती होती, याचबरोबर व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, मेडिकल एज्युकेशन युनिटचे प्रमुख डॉ. सुयोग चोपडे हे उपस्थीत होते.

अध्यक्षस्थानावरुन डॉ.उल्हास पाटील यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली. मेडिकल एज्युकेशनमधील नविन बदलांची माहिती प्राध्यापकांना देणे हा कार्यशाळेमागील उद्देश्य आहे. यात पंचविस प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना डॉ. सुयोग चोपडे, डॉ. जयंत देशमुख, डॉ. माया आर्विकर, डॉ. एन. एस. आर्विकर, डॉ. अमृत महाजन, डॉ. कैलास वाघ, डॉ. राहूल भावसार, डॉ. अनिता फटिंग, डॉ.नेहा महाजन, डॉ. रंजना शिंगणे, डॉ. देवेंद्र चौधरी आदिंचे मार्गदर्शन लाभले. ही कार्यशाळा २१ सत्रांमध्ये विभागली गेली होती. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कार्यशाळेचा समारोप सहभागी प्राध्यापकांना व मार्गदर्शकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करून करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!