डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

शेअर करा !

भिवंडी (वृत्तसंस्था) एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

रोजी चव्हाण कॉलनी परिसरात राहणारी महिला आणि तिची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ३० जुलै या दोघींची प्रकृती बरी नसल्याने दोघीही जवळच्या गुलजार नगर येथील डॉ. बदरुजमा खान यांच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींवर उपचार करुन औषध देऊन परत दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलावले होते. दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी मुलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नसल्याने आईने मुलीला लहान भावासोबत दवाखान्यात उपचारासाठी पाठविले. मात्र, पीडित १४ वर्षीय मुलीसोबत आलेल्या लहान भावाला सुट्टे पैसे आणण्यासाठी दवाखान्याबाहेर पाठवले. त्यानंतर पीडितेस तपासणीच्या बहाण्याने झोपवून दवाखान्यात कुणीही नसल्याचा गैरफायदा उचलत डॉक्टरने मुलीवर अत्याचार केला. भेदरलेल्या पीडितेने डॉक्टरला धक्का देऊन तेथून पळ काढला आणि सदर प्रकारानंतर आपल्या मावशीच्या घरी गेली. तिथे पीडितेने आपल्यासोबत घडलेली हकीकत मावशीला सांगितली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी डॉक्टर बदरुजमा खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!