डी-मार्टमधून ग्राहकाची दुचाकी लंपास; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । डी-मार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाची दुचाकी पार्किंगमधून लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शेख असलम शेख इस्माईल रा. संतोषी माता मंदीराजवळ, मेहरूण हे आपल्या परिवारासह ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेला डीमार्टमध्ये दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएम ९०९६)ने खरेदी करण्यासाठी आले होते. किराणा खरेदी केल्यानंतर ५ वाजता दुचाकीजवळ गेले असता दुचाकी मिळून आली नाही. कदाचित कुणी नजरचुकीने चावी लावून घेवून गेला असेल असा समज झाला. तीन ते चार दिवस संपुर्ण परिसर शोधून काढला मात्र मिळून आली नाही. आज अखेर रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास चंद्रकांत पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.