डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे स्वागत

शेअर करा !

 

भुसावळ, प्रतिनिधी । शिर्डी येथून बदली होऊन आलेले सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ येथील डीवायएसपी पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. त्यांचे स्वागत जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे करण्यात आले.

सोमनाथ वाघचौरे यांनी २०११ मध्ये प्रशिक्षण घेऊन २०१५ ते २०१७ दरम्यान नागपूर येथील एसीपी क्राईममध्ये त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर डीवायएसपी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. गेल्यावर्षी शिर्डी येथील डीवायएसपी पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता. तेथून त्यांची बदली भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारीपदी झाली. त्याबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे स्वागत करण्यात आले. जळगाव येथील राहूल चौधरी व मनोज खडके आणि भुसावळ येथील डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लेखन व वाचनाची आवड असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!