डांगर बु॥ येथील विकासोची निवडणूक बिनविरोध

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डांगर बु॥ गावात ग्रामस्थांनी 35 वर्षांची परंपरा कायम ठेवत विकासोची निवडणूक बिनविरोध पार पाडली.

या सोसायटीचे दुसरे वैशिट्य म्हणजे या सोसायटीचा कारभार उत्तम आणि पारदर्शकपणे चालवणारे शांताराम सिताराम पाटील यांना तब्बल 25 वर्षांपासून  चेअरमनपदी विराजमान ठेवण्याचा विक्रम स्व.उदय वाघ यांनी केला असताना स्मिता वाघ यांनीही पुन्हा त्यांनाच चेअरमनपदी विराजमान करून वाघांचीच परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच व्हा चेअरमनपदी अतिशय सामान्य कुटुंबातील असलेले क्रियाशील व्यक्तिमत्व बारकू तापीराम पाटील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.सुरूवातीला सण 2021 ते 2026 या कालावधीसाठी झालेल्या या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल प्रवर्गातून वाघ आनंदा, रामभाऊ पाटील, नरेंद्र नाटू, वाणी राजेंद्र रघुनाथ, सोनवणे गिरधर खंडू, पाटील शांताराम सिताराम, वाघ स्मिता उदय, मोरे जितेंद्र अशोक, पाटील बारकू तापीराम, महिला राखीव मधून पाटील योगिता प्रविण व पाटील मिनाबाई शिवाजी, विजाभज मधून वंजारी मखराम परमा, अनु जाती जमाती मधून खैरनार आधार हुना तर इमाव मधून पाटील सुभाष परशुराम आदी 13 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

स्मिता वाघ यांनी यातही सर्व समाजाना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून यासाठी संपुर्ण ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.तर 35 वर्षांपासून सुरू असलेली बिनविरोध ची आदर्श परंपरा यंदाही कायम राहिल्याने या गावाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!