ठोस निर्णय होण्यापूर्वी एमपीएससी परीक्षा घेतल्यास केंद्र फोडू

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

 

बीड,वृत्तसंस्था । जिल्ह्यातील परळी शहरात मराठवाडा विभागीय स्तरावरील बैठकीत ‘मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय होईपर्यंत सरकारने कोणतीही एमपीएससी परीक्षा घेऊ नये अन्यथा परीक्षा केंद्र फोडून टाकू’ असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या राज्य समन्वयकांनी दिला आहे. ही बैठक अक्षता मंगल कार्यालयात घेण्यात आली.

या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली तसेच आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत सरकारने एकही भरती करू नये, अशी मागणी करण्यात आली.येत्या 10 तारखेच्या अगोदर नोकरभरती आणि शिक्षणातील आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय झाला नाही तर परळी शहरात 11 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन केला जाणार असल्याचे आजच्या समन्वयकांच्या बैठकीत ठरले आहे. सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदला आपला पाठिंबा नसल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. अशा बंदमुळे काहीही साध्य होणार नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.