ठाकूर समाज मंडळातर्फे लेखक विश्वास ठाकुर यांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी । येथील  अमळनेर ठाकूर समाज मंडळातर्फे बँकर, लेखक विश्वास ठाकूर यांना ‘सन्मान दिपस्तंभाचा’ गौरव पत्र देऊन समारंभपूर्वक रोटरी हॉल येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

 

विश्वास ठाकूर हे सहकार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व असून फोर्ब्स इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया, द इकॉनॉमिक्स टाइम्स,  फॉर्च्यून इंडिया यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मीडियाने विश्वास ठाकूर यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे . दै.दिव्य मराठी, दैनिक सकाळ यासह विविध वृत्तपत्र समूह व विविध क्षेत्रातील संस्थांनी व जबाबदार समूहांनी त्यांना विविध पुरस्कार दिलेले आहेत. तसेच नुकतेच द इकॉनॉमिक्स टाइम्स च्या ‘इंस्पायरिंग लिडर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सततच्या प्रेरणादायी कार्यामुळे विश्वास ठाकूर हे समाजातील शिक्षित भावीपिढीसमोर दिपस्तंभ म्हणून उभे आहेत. यापार्श्वभूमीवर अमळनेर ठाकूर समाज मंडळातर्फे राज्य सरचिटणीस,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव प्रकाश वाघ, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष संजय ठाकूर, दिलीप वानखेडे, चंद्रशेखर ठाकूर, डॉ.कौस्तुभ वानखेडे, देविदास ठाकूर, निलेश वाघ, मछिंद्र ठाकूर आदिंनी गौरवपत्र व पुष्प देऊन सत्कार केला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन, कृष्णा पाटील, जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अनिरुद्ध कांबळे, शब्द मल्हार प्रकाशनाचे संपादक स्वानंद बेदरकर, ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचे प्रमुख विनायक रानडे, तहसीलदार सुदाम महाजन आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून तर सुप्रसिद्ध लेखक व कवी  डॉ. मिलिंद बागुल हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!