ट्रॅक्टरच्या दोन बॅटऱ्यांची चोरी

पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील श्रीराम नगर मध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या दोन बॅटर्‍यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश रामदास होईल (वय-२९) रा. श्रीराम नगर, मुक्ताईनगर अरुण परिवारासह वास्तव्याला आहे, त्यांच्याकडे शेती करण्यासाठी ट्रॅक्टर आहे. १४ नोव्हेंबर सायंकाळी ७ ते १५ नोव्हेंबर सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरच्या ७ हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार गणेश भोई यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महंमद तडवी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content