ट्रॅक्टरच्या अपघातात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव ट्रॅक्टरचे चाक पोटावरुन गेल्याने जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय भिका चौधरी (वय-४३, रा. सावखेडा, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे विजय चौधरी हे वास्तव्यास असून ते शेतकरी होते. मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्याने विजय चौधरी ही खाली पडला. त्यानंतर ट्रॅक्टर पुढचे चाक पोटावरून गेल्याने विजय हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना विजयचा मृत्यू झाला होता. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. याप्रकरणी शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक भगीरथ प्रताप पाटील रा. सावखेडा ता.जि. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content