ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसचे महाविरणवर हल्लाबोल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातील ट्रान्सफार्मरसाठी काँग्रेसतर्फे आज महावितरण विभागावर हल्लाबोल आंदोलन केले. मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरण सोडले.

अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सारोळा बु” येथील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर हा गेल्या एक महिन्यापासून त्रासदायक ठरत असल्याने विज पुरवठा सुरळीत होत नाही. तर भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकऱ्यांच्या शेत शिवारातील ट्रान्स्फारमर गेल्या विस दिवसा पासुन जळाला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन देखील दुर्लक्ष होत असल्याने सबंधित शेतकऱ्यांचे उभे पिक जळायला लागले आहे. आज पाचोरा महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी हल्ला बोल केला. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता रविंद्र शिरसाठ यांना निवेदन दिले. रविंद्र शिरसाठ यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ प्रश्न मार्गी लावला जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर त्यामुळे सकाळ पासून टातकळत बसलेल्या शेतकऱ्यांचे समाधान झाले. प्रभारी कार्यकारी अभियंता रविंद्र शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून तात्काळ मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरण सोडले.

यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, विठ्ठल पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, मधुकर पाटील, सारोळा बु” येथील शेतकरी रुपेश पाटील, रमेश भदाणे, संदीप भदाणे, जगदीश शेलार, शांताराम चौधरी, गणेश तायडे, नितीन पाटील, भरत महाजन, राहुल शिंदे, भागवत जगताप, गोकुळ पाटील, विठ्ठल शेलार उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आंदोलना नंतर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content