यावल प्रतिनिधी । रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी व ट्रक यांच्या अपघातात जळगाव शहर पोलीस स्थानकात कार्यरत असणार्या शेखर तडवी या कर्मचार्याचा मृत्यू झाला.
हंंबर्डी येथील रहिवासी पोलिस कर्मचारी शेखर मेहबूब तडवी (वय ३०) हे यावलकडून दुचाकीने किनगावकडे जात होते. गिरडगाव जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवण्याच्या बेतात समोरून येणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तडवी यांना रुग्ण वाहिकेतून जळगावला हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.