टोळी येथील अत्याचार , हत्याकांडाच्या गुन्ह्यात नराधमांना फाशी द्या

चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीची मागणी

शेअर करा !

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । टोळी (ता पारोळा) येथील तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्या अशी मागणी चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीने केली आहे

ही तरुणी पारोळा येथील लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती दिवाळीच्या सुट्टीत पारोळा येथे वास्तव्याला असलेल्या आपल्या मामाकडे ३ नोव्हेंबर पासून आली होती दिनांक ७ रोजी दुपारी मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली पण उशीरा पर्यंत घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेऊनही तपास लागला नव्हता

तिच्या मामांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिनांक ८ रोजी सकाळी ती हरवल्याची तक्रार केल्या नंतर आठ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ती जुलूमपुरा येथे मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली यावेळी याठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांनाही ही मुलगी दिसली त्यांनी लगेच मोटारसायकलीने तिला पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले होते

प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले उपचारादरम्यान तीन दिवस तिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिची प्राणज्योत मालवली शवविच्छेदनानंतर या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद आहे

तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना जलद न्यायालयात केस चालवून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी चाळीसगाव तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख सविता कुमावत , अनिता जाधव, सविता मोरे, सुनीता पवार, ज्योती गवळी, वंदना जाधव, अश्विनी जाधव, कोमल जाधव, माधुरी सोनवणे ,प्रतिभा सोनार. आदी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!