झोटिंग समितीचा फास अन खडसेंना केवळ त्रास होता — नाना पटोले

 

मुंबई : वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस  खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते. एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी झोटिंग समिती  हा एक फास होता का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

 

ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. खडसेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग कमिटीचा अहवाल गायब आहे. त्यावरुन पटोलेंनी हल्लाबोल केला.

 

पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आरोपही  नाना पटोलेंनी केला. भाजप बहुजन चेहरे वापरतो आणि नंतर बाजूला करतो.  भाजप हा बहुजन विरोधी पक्ष आहे, असा हल्लाबोल पटोलेंनी केला.

 

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्याची रणनीती आखली. मराठा आणि  ओबीसी  समाजाचे आरक्षण कसे देता येईल याची चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं. मी काही चुकीचं बोललो नाही. पक्षप्रमुख म्हणून बोलणं हे काम आहे. कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकणं माझं काम आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.

 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीदेखील तेच सांगितलं. पण मला विरोध का होतोय माहिती नाही. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्व सुरळीत सुरु आहे, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं.

 

महागाई विरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीकोनातून बैठका सुरु आहेत. कोणीतरी मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरतात, केंद्र लस पुरवत नाही. चीन बॉर्डवर येऊन बसला आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!