ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात भाग्यश्री राठोड प्रथम

 जामनेर, प्रतिनिधी । ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक, मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथील एस.एस.सी.बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल १००टक्के लागला असून विद्यालयातून भाग्यश्री राठोड हिने प्रथम क्रमांक पटकाविला. 

 

ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून  प्रथम  क्रमांकाने भाग्यश्री यशवंत राठोड ही ९२.६०%गुणांनी उत्तीर्ण झाली. तर द्वितीय क्रमांकाने प्रशांत वाल्मिक सुतार ८९.६०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला आणि  तृतीय क्रमांकाने अविनाश सुभाष नाईक हा ८६.६० %गुण मिळवून  उत्तीर्ण झाला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.मंत्री गिरीष महाजन, संस्थेचे सर्व व संचालक मंडळ पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!