जे मिळेल त्यातच राहतात समाधानी, तेच खरे सुखी : एकनाथ महाराज

मेहरुणमध्ये हरी कीर्तनाला प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला सुखी व्हायचे आहे.  पण सुखी होण्याची व्याख्या नेमकी काय आहे ? याच्या शोधात प्रत्येक जण दिसतो. या जगात सुखी तेच आहेत, जे भगवंताचे नामस्मरण करतात व आयुष्यात मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधानी आहेत, असे मार्गदर्शन कीर्तनकार हभप एकनाथ महाराज, जामनेर यांनी भाविकांना केले.

 

येथील मेहरूण प्रभागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.  हभप एकनाथ महाराज म्हणाले की, सर्व धावपळ सुखासाठी सुरू आहे.  मनुष्यप्राणी सुखी होण्यासाठी धडपडत आहे. मात्र सुख मिळविण्यासाठी कष्ट घेणे कोणालाही चुकले नाही, असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विविध अभंगांचे दाखले दिले. यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या  गुरुवार  रात्री दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता चिखली येथील हभप दिनेश महाराज किर्तन करणार आहेत.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content