जे. के. फाऊंडेशन व शिक्षण विभागातर्फे मोफत तपासणी शिबिर

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जे.के. फाउंडेशन व शिक्षण विभागातर्फे मोफत तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर आज आयोजीत करण्यात आले.

 

एकलव्य माध्यमिक विद्यामंदिर शाळेमध्ये जे. के. फाउंडेशन व शिक्षण विभागातर्फे  शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  मोफत तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एडवोकेट शिवाजी सोनार, जे.के चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नवल राजपूत, नगरसेवक पती सुहास पाटील, डॉक्टर चंद्रकांत साळुंखे, अधिकारी राम लोहार, गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, विजय सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

जामनेर येथील शिक्षण विभाग व जे. के. फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना येणार्‍या अडीअडचणी दूर करून त्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र मिळावे या माध्यमातून एकलव्य शाळेमध्ये तपासणी व प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरामध्ये हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप पाटील विजय गायकवाड किरण पाटील प्रवीण पाटील कैलास पाटील रामचंद्र बनसोडे यांच्यासह शिक्षण विभाग व जे के फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content