जेसीआय जळगाव सेंट्रल पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

जळगाव, प्रतिनिधी | येथील जेसीआय जळगाव सेंट्रलचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. नूतन अध्यक्ष वेणुगोपाल झंवर यांनी मावळते अध्यक्ष श्रेणिक जैन यांचेकडून तर नूतन सचिव तुषार बियाणी यांनी मावळते सचिव भावेश जैन यांचेकडून पदभार स्वीकारला.

 

जेसीआय जळगाव सेंट्रलची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. रविवारी दि. ६ जानेवारी रोजी सुरभि लाव्नस येथे एका कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी झोन अध्यक्ष नंदलाल जयस्वाल, माजी राष्ट्रीय संचालक स्वरूप लुंकड यांचेसह आर्यन इको रिसॉर्टच्या संचालिका रेखा महाजन यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थितांशी संवाद साधत नूतन कार्यकारिणीला सदिच्छा दिल्या.

प्रसंगी, वर्षभरात राबविण्याचे विविध उपक्रमांविषयी अध्यक्ष वेणुगोपाल झंवर यांनी माहिती दिली. नूतन सदस्यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

सूत्रसंचालन वेणुगोपाल बिर्ला आणि दिव्या झंवर यांनी तर आभार तुषार बियाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी ऋषभ शहा, पियुष शर्मा, निखिल कटारिया, कल्पक सांखला, चेतन सेठ, शिवनाथ जांगीड, हर्षल मंडोरे, अक्षय गादिया, अभिलाष राठी, प्रसाद झंवर यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!