जुन्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील सुभाष कॉम्प्लेक्स समोर हातगाडीवर असलेल्या एका वृद्धाला जुना वाद उकरून एकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील हरीओम नगर येथील पंडित झिंगा चौधरी (वय-७०) हा वृध्दा १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास सुभाष कॉम्प्लेक्स समोर हातगाडीवर बसलेला होता. त्यावेळी
गौतम दिलीप मोरे रा. हरीओम नगर, चाळीसगाव हा त्याठिकाणी येऊन वृद्धाला शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर गौतम मोरे यांनी वृद्धाला उचलून रोडावर फेकले. त्यात पंडित चौधरी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मार लागून फ्रॅक्चर झाला. यात पंडित चौधरी यांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी पंडित चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२५, ३२३, ५०४ व ५०६ अशा विविध कलमान्वये गौतम दिलीप मोरे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भगवान उमाळे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!