जुन्या वादातून तरूण शेतकऱ्यावर चाकू हल्ला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे जुन्या वादातून ४ जणांनी तरुण शेतकऱ्याला लाकडे दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. तसेच त्याच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान भिकन पाटील (वय-२८) रा. सातगाव डोंगरी ता.पाचोरा हा तरुण शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. जुन्या वादातून ८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता गावातील चेतन निंबा पाटील, सागर निंबा पाटील, निंबा लक्ष्मण पाटील आणि उषाबाई निंबा पाटील यांनी बेदम मारहाण केली. तर चाकूने वार करून जखमी केले. यामध्ये समाधान पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात समाधान पाटील यांच्या जबाबावरून संशयित आरोपी चेतन निंबा पाटील, सागर निंबा पाटील, निंबा लक्ष्मण पाटील आणि उषाबाई निंबा पाटील यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे करीत आहे.

 

Protected Content