जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी | राज्य सरकारी -निमसरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी ‘राष्ट्रीय पेन्शन योजना हटाव दिन’ निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात “ ठिय्या आंदोलन” करण्यात आले.

 

जिल्हाध्यक्ष मगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी योगेश नन्नवरे, अनिता पाटील,सर्जेराव बेडीस्कर, डी. एम. अडकमोल,वासुदेव जगताप यांनी संबांधित केले आंदोलन दि.१ नोव्हेंबर २००५ पासुन राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद व शिक्षक व शिक्षकेतर तसेच महामंडळाच्या सेवांमध्ये रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या शाश्वत पेन्शन योजनेऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (NPS) लागु करण्यात आली आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात एकत्रित एकच मोठी ताकद उभारणे आवश्यक आहे. संघटनेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून नवीन राष्ट्रिय पेन्शन योजना (NPS) हटाव आंदोलन करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. अशी मागणी संघटना व कर्मचा-यांच्या वतीने करण्यात आली जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत असे आंदोलन सुरु राहतील असे संघटनेचे अध्यक्ष मगन व्यंकट पाटील यांनी सांगितले. आंदोलन यशस्वी करण्या साठी योगेश नन्नवरे, दिनकर मराठे, अनिता पाटील, नम्रता नेवे, सर्जेराव बेडीस्कर, वासुदेव जगताप, एच. एच. चव्हाण, गोविंदा पाटील, घनश्याम चौधरी आदींनी कामकाज पहिले.

Protected Content