यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोण म्हणत देत नाय, घेतल्या शिवाय रहात नाही,जुनी पेन्शन योजना सुरू करा, पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी यावल तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी संपात सहभागी झाले होते. या संपाचा मोठा परिणाम जाणवत असल्याने जवळपास सर्व शासकीय कार्यालयांवर शुकशुकाट दिसून आला.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय-निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवेसह पंचायत समिती,तहसील कार्यालयातील नागरिकांची कामे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय कार्यालये ओस पडल्याने शासकीय कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. मात्र संपाच्या काळात दहावी व बारावी शालांत परीक्षा सुरळीत सुरु आहेत. संपाच्या पुर्वी ज्या शिक्षकांची नेमणुक केन्द्रांवर झाली असुन ते आपले कर्तव्य पार पाडीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.