जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर वाढीव कलमासह गुन्हे दाखल करण्याची मागणी

नशिराबाद येथील जीवघेणा हल्ल्यात तरूण गंभीर; इतरांवर वाढीव कलम लावण्यासाठी एसपींना निवेदन

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे किरकोळ कारणावरून तरुणासह त्याच्या परिवारावर तलवार, लोखंडी रॉड कुऱ्हाड इतर तिक्ष्ण हत्याराने बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये एका तरूणाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मारहाण करण्याऱ्यांचा समावेश करण्यात यावा आणि वाढीव कलम लावण्यात यावे अशी मागणीचे निवेदन तक्रारदार अक्रम शाह सादीक शाह यांनी गुरुवारी २५ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना निवेदन दिले आहे.

अक्रम शाह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे मोमीन मोहल्ला येथे किरकोळ कारणावरून आक्रम शाह सादीक शाह यांच्यासह चुलत भाऊ वसीम शाह रहमान शाह, अख्तर शाह रहमान शाह, एजाज मेहमूद पिंजारी यांच्यावर २० ते २५ जणांनी तलवार, लोखंडी रॉड, कुऱ्हाड व इतर धारदार हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात वसीम शाह रहमान शाह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रकती चिंताजनक आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात मारहाण करणारे २० ते २५ जण असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे, दरम्यान हा हल्ला जीवघेणा असल्याकारणामुळे संबंधित संशयित आरोपींवर वाढीव कलम लावण्यात यावे तसेच गुन्ह्याचा तपास निपक्षपणे करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार अक्रम शाह सादिक शाह रा. मोमीन मोहल्ला नशिराबाद यांनी गुरुवार २५ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content