जि.प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जिजाबराव पाटील

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जिजाबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची औरंगाबाद येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आरोग्य विभागातील लिपिक जिजाबराव पाटील यांची राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, सचिव अरुण जोर्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!